देवळालीच्या आमदार सरोज आहिरे करोना पॉझिटिव्ह

देवळालीच्या आमदार सरोज आहिरे करोना पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील करोना (Corona) रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. आज देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. याबाबत आमदार आहिरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली आहे...

आ. सरोज आहिरे यांनी म्हटले आहे की, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन.

देवळालीच्या आमदार सरोज आहिरे करोना पॉझिटिव्ह
...अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com