नाशिक । Nashik

शेतकऱ्यांचा किंवा इथल्या जनतेचा वापर फक्त राजकारणासाठी करण्यात येतो. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कांद्याला भाव दिला जातो. नंतर निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. अशा पद्धतीचे राजकारण सध्या देशात चालू असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी केले.

नाशिक येथील दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले कि, शेतकऱ्यांचा वापर हा फक्त राजकारणासाठी केला जात असून दिल्लीतील शेतकरी आंदोलन त्यामुळेच उभे राहिले आहे.

तर युवा पदाधिकार्यांना ते म्हणाले कि तर भाजपचा सोशल मिडिया एखादी गोष्ट फुलवून सांगतो. त्या पद्धतीने आपल काम नसून आपला प्रत्येक कार्यकर्ता तळागाळात जाऊन काम करतो आहे. तसेच आपल काम लोकांना वाजवून सांगितलं पाहिजे. जेणेकरून लोकापर्यंत आपल्या कामाची पोचपावती गेली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या समस्या, त्यांच्या अडीनडीला उभं राहील पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान युवा पदाधिकाऱ्यांच्या संवादानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या सोशल मीडियाचा खरपूस समाचार घेतला. ते आज कळवण मुक्कामी जाणार असून त्या ठिकाणी डोंगऱ्या देव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच कळवण येथील पारंपरिक फेस्टिव्हल अनुभवायचं आहे म्हणून चाललो आमदार म्हणून नाही असेही त्यांनी सांगितले.