नाशिकरोड l Nashikroad (प्रतिनिधी)

आमदार रोहित पवार हे नाशिक दौरा वर आले असता देवळाली कॅम्प येथील कार्यक्रम आटोपून नाशिक शहरात कार्यक्रम साठी विहितगाव वडनेर मार्गी जाणार होते.

यावेळी नाशिकरोड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विहितगाव येथील चौफुली वर त्यांचे स्वागत करण्यात आले. या दरम्यान बाजूला असलेल्या मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत होते.

हे आ. रोहित पवार यांनी बघातल्यावर त्याना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे आ. पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्त विक्रम कोठूळे यांच्या बुलेटवर बसून क्रिकेटच्या मैदानावर गेले.

त्यांनी बॅट घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. सुमारे पंधरा मिनिटे आ. रोहित पावर यांनी बेटिंग केली, यावेळी त्यांचा झेल नगरसेवक जगदीश पवार यांनी घेतला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, ब्लॉक अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार, विक्रम कोठुळे व इतर क्रिकेट प्रेमी उपस्थीत होते.