आमदार नितीन पवार यांची निवड
नाशिक

आमदार नितीन पवार यांची निवड

महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या सदस्यपदी राज्यपालांनी केली नियुक्ती

Abhay Puntambekar

कळवण । प्रतिनिधी Kalwan

राज्यातील आदिवासीच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन करणे व राज्यपालांना सल्ला देणे या संदर्भात पुनर्रचना करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या सदस्यपदी कळवणचे आमदार नितीन पवार यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिषदेची पुनर्रचना केली असून २० सदस्य असलेल्या समितीत राज्यातील अनुसूचित जमातीच्या सदस्याचा त्यात समावेश असून राज्यपालांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नावांची शिफारस केली होती त्यात नाशिक जिल्ह्यातून आमदार नितीन पवार व इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचा समावेश आहे. माजीमंत्री स्व ए टी पवार हे जनजाती सल्लागार परिषदेचे यापूर्वी जिल्ह्यातून सदस्य होतें.

राज्य शासनाला आदिवासींच्या हितसंवर्धनासाठी विकासासाठीच्या कार्यक्रम, योजना आखण्यासाठी सल्ला देणे व सहकार्य करणे अशी महत्त्वपूर्ण कार्ये या सल्लागार परिषदेचे आहे. आदिवासींचे विस्थापन, वनाधिकार कायदा, भूमी संपादन या विषयावर सल्लागार परिषद प्रभावी भूमिका घेणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेचे पदसिध्द अध्यक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असून आदिवासी विकासमंत्री के सी पाडवी उपाध्यक्ष आहे तर सदस्य म्हणून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार धर्मराजबाबा आत्राम,श्रीमती लताबाई सोनवणे, दौलत दरोडा, नितीन पवार, सुनील भुसारा, हिरामण खोसकर, शिरीष नाईक, डॉ किरण लहामटे, शांताराम मोरे, मंजुळा गावित, श्रीनिवास वनगा, सहसराम कोरोटे, राजेश पाटील, राजकुमार पटेल, मिलिंद थत्ते, डॉ आर के मुताटकर यांची नियुक्ती असून समितीचे सदस्य म्हणून आदिवासी विकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल काम पाहणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com