टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक; आमदार कोकाटे नाशिक बाजार समितीत

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक; आमदार कोकाटे नाशिक बाजार समितीत

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nashik Agricultural Produce Market Committee) मागील आठवड्यात टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे (Farmers) जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपये घेऊन पसार झाल्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करत बाजार समिती प्रशासनास निवेदन दिले होते.

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक; आमदार कोकाटे नाशिक बाजार समितीत
नाशकात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्यांसाठी सिन्नरचे आमदार ॲड.माणिकराव कोकाटे (MLA Adv. Manikrao Kokate) यांनी सोमवारी (दि.३) बाजार समिती सचिवांची भेट घेतली. प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना मदत करा, असे त्यांनी सांगितले.

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक; आमदार कोकाटे नाशिक बाजार समितीत
उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे नाशिक तालुक्यासह (Nashik Taluka) सिन्नर, कळवण, दिंडोरी शहरालगतच्या खेड्यापाड्यातून टोमॅटो विक्रीसाठी येतात. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी, समशाद फारुकी हे जवळपास १७९ शेतकऱ्यांचे १ कोटी ८० लाख रुपये घेऊन पसार झाले आहेत.

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक; आमदार कोकाटे नाशिक बाजार समितीत
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लगीनघाई; लवकरच उरकणार साखरपुडा!

या प्रकरणात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आमदार ॲड. कोकाटे आणि समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्य बाजार समितीतील सचिव अरुण काळे (Arun Kale) यांची भेट घेतली. आमदार कोकाटे आणि बाजार समिती सचिव अरूण काळे यांच्यात चर्चा होऊन ज्या व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे घेणे बाकी आहे, त्या व्यापाऱ्याचे बाजार समिती आवारात असलेले गाळे विक्री करत आलेल्या पैशातून समान हिस्से करत शेतकऱ्यांना वाटप करावे,असे कोकाटे यांनी सांगितले.

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक; आमदार कोकाटे नाशिक बाजार समितीत
खासदार संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले...

दरम्यान, यानंतर कोकाटे यांनी बाजार समिती कार्यालयातूनच पोलीस आयुक्तांना फोनवरून घडलेल्या प्रकरणाबाबत हकीकत सांगितली. त्यावर पोलीस आयुक्तांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ पोलीस आयुक्तालयात पाठविण्याबाबत सांगितले असून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आमदार कोकाटे यांना दिले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com