आमदार खोसकर
आमदार खोसकर
नाशिक

वाडीव-हे विजवितरण केंद्राला आमदार खोसकर यांची भेट

अधिकारी, कर्मचा-यांना सुचना

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी वाडीव-हे येथील 33/11उपकेंद्राला अचानक भेट देवून परिस्थिती जाणून घेतली. येथील मुख्य अभियंता धवल आगरकर यांनी त्यांचे स्वागत केले. भौगोलिक दृष्टया सर्वाधिक लांब पल्ल्याच्या विज वाहक तारा आणि गोंदे-वाडीव-हे औद्योगिक वसाहतीचा भार असलेल्या वाडीव-हे विज वितरण केंद्राच्या नांदगाव बु. फीडर बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

येथील विजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी त्रस्त आहेत. शिवाय रात्री नेहमीच विज पुरवठा खंडित केला जातो असा आरोप येथील नागरिकांनी केला असुन याबाबतची कैफियत आमदार खोसकर यांच्या कानावर पडताच याची शाहानिशा करण्यासाठी आणि हा प्रश्न सोडविन्यासाठी आमदार खोसकर यांनी तड़क येथील उपकेंद्रास भेट देवून परिस्थिती जाणून घेतली.

नांदगाव बु. फीडर लांब व झाड़ी, झुडपे तसेच डोंगराळ परिसरात असल्याने येथे केव्हाही विज गायब असते. ही बाब खरी असली तरी या अंतर्गत जानोरी व खल्लाळ परिसराला नांदगाव बु. फीडर मधून विभक्त करून येथील विज पुरवठा पाडळी उपकेंद्र मधून देण्याची तयारी झाली असुन येत्या काही दिवसांत याबाबत कार्यवाही सुरु होऊन काम मार्गी लागेल असे आश्वासन अधिकारी धवल आगरकर यांनी आमदार खोसकर यांना दिले आहे. त्यामुळे येथील विजेचा भार कमी होऊन नांदगाव फीडर ही सुरळीत चालेल असे सांगितले जाते आहे.

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदगाव बु. जानोरी, नांदुरवैद्य व आसपासच्या मळे परिसरातील नांदगाव फीडरला वाडीव-हे येथून विज पुरवठा केला जातो. हा परिसर सर्वाधिक डोंगर व झाड़ा झुडपांचा आहे. साहजिक येथूनच अनेक विज वाहक तारा गेलेल्या आहेत. मात्र पावसाळ्यात कित्येकदा या तारा तुटून, झाड़े पडून, खांब जमींनदोस्त होऊन विजपूरवठा खंडित होऊन नागरिकांना अंधारात रहावे लागते.

सध्या महावितरणाकड़े कर्मचारी संख्या कमी आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खोसकर यांनी अधिकारी यांना सूचना करून कर्मचारीत वाढ करण्याच्या सूचनाही केल्या. उपकेंद्रबाबत आगरकर यांनी सखोल माहिती व कामाचे आहवाल दाखवले. यावेळी गोंदे दुमालाचे माजी उपसरपंच कमलाकर नाठे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com