शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या; खोसकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या; खोसकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

इगतपुरी |Igatpuri | प्रतिनिधी

इगतपुरी - त्र्यंबकेश्र्वर तालुक्यात (Igatpuri - Trimbakeshwar Taluka) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे ( crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इगतपुरी - त्र्यंबकेश्र्वर तालुक्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई (compensation for damages) मिळावी अशी मागणी आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी पावसाळी अधिवेशनात (monsoon session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये (Constituency) १०० टक्के आदिवासी जनता (Tribal people) असुन गेल्या जुलै महिन्यापासून आतापर्यंत सतत पडणा-या अतिवृष्टीमुळे पिकांचे सरसकट नुकसान झालेले आहे. सतत पडणा-या या अतिवृष्टीमुळे व मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

सततच्या पावसामुळे पिके वाहुन गेल्याने व शेत पिकात पाणी साचल्याने तसेच सुर्य प्रकाश न मिळाल्याने जमिनीत सातत्याने आर्द्रता राहिल्याने पिके कुजल्याने शेतकरी (farmer)बांधवाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुके १०० टक्के आदिवासी तालुके असून येथील नागरिकांचे उत्पन्न हे पुर्णत: शेतीवर अवलंबुन आहे. शेतीच्या उत्पन्ना शिवाय कोणतेही साधन नाही. अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट असुन शेतक-यांच्या घरांची पडझड झाल्याने निवा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच इगतपुरी - त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात (Rice) हे महत्वाचे पिक असून त्याचबरोबर भुईमुग नागली, सोयाबीन, भाजीपाला, ही पिके घेतली जातात. तर सततच्या होणाऱ्या पावसामुळे या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार खोसकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com