
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नेत्ररोगतज्ञ डॉ.प्राची पवार (Dr. Prachi Pawar) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जलदगतीने तपास करून आरोपींना बेड्या घाला. तसेच त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांना दिल्या...
गोवर्धन परिसरात राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या डॉ.प्राची पवार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामध्ये डॉ.पवार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. डॉ.प्राची पवारांवर सुश्रुत हॉस्पिटल (Sushrut Hospital) येथे उपचार सुरु असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत पवार कुटुंबियांची भेट घेतली.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.