
नाशिक । Nashik
सरकारी कामात अडथळा (Obstruction of government work) आणल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीसांत (Case Filed At sarkarwada Police Thane) गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आ. बच्चू कडू (MLA Bachhu Kadu) आज नाशिक जिल्हा सत्र (Nashik Court) न्यायालयात हजर उपस्थित होते.
२०१७ ला नाशिक महापालिकेवर (Nashik Mahapalika) प्रहार संघटनेच्या 9Prahar Sanghtana) नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. यावेळी अपंगांचा तीन टक्के निधी (Three per cent disability fund) खर्च करण्याची तरतूद असताना निधी खर्च का झाला नाही, याचा जाब विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू अपंगांच्या शिष्टमंडळा(Disability Delegation) सह पालिकेत आले होते.
याबाबत वादविवाद झाले होते, त्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही (Arrest) करण्यात आली होती. त्यानंतर पकड वारंट निघाला होता. सध्या पकड वारंट रद्द करण्यात आला असून दरम्यानच्या काळात जामीनदार मरण पावल्याने कोर्टात हजर रहाव लागल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.
काय आहे प्रकरण ?
नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन बाचाबाची झाली होती. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वाना शांत करत वाद मिटवला होता. या घटनेनंतर आमदार कडू यांना पोलिसांनी अटक झाली होती.