आमदार बच्चू कडूंना दिलासा! 'त्या' प्रकरणाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

आमदार बच्चू कडूंना दिलासा! 'त्या' प्रकरणाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

नाशिक | Nashik

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. नाशिकमध्ये सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने ५ हजारांचा दंड आणि एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती...

काही वर्षांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका आयुक्तांवर हात उगारने भोवले होते. यानंतर या प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी एका वर्षांची शिक्षा सुनावली होती. नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

आमदार बच्चू कडूंना दिलासा! 'त्या' प्रकरणाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती
Mann Ki Baat 100th Episode : 'मन की बात' माझ्या मनाची आध्यात्मिक यात्रा; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नाशिकच्या याच प्रकरणात बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यातील शिक्षेला स्थगितीदेखील मिळाली आहे.

आमदार बच्चू कडूंना दिलासा! 'त्या' प्रकरणाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती
संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांच्या माध्यमातून...; नितेश राणेंचा खळबळजनक दावा

दरम्यान, 2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केले होते. अपंगांसाठी राखीव निधी खर्च न केल्याबद्दल प्रहार अपंग क्रांतीने केलेल्या निदर्शनामध्ये कडू यांचा सहभाग होता. आयुक्त आणि जमावामध्ये बाचाबाची झाली होती असता बच्चू कडू तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा (Abhishek Krushna) यांच्या अंगावर धावून गेले होते.

पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडविला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केल्यानंतर नायालयाकडून बच्चू कडू यांना दिलासा देत १ वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com