आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर; राज्य सरकारवर साधला निशाणा

आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर; राज्य सरकारवर साधला निशाणा

नाशिक | Nashik

काही दिवसांपूवी सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी आज सिन्नर तालुक्यातील सोनारी परिसरात (Sonari Area) भेट देत अतिवृष्टीने (Heavy Rain) नुकसानग्रस्त झालेल्या शेतीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली...

यावेळी ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांसोबत असून प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू. तसेच कोणत्याही शेतकऱ्याने धीर सोडू नये उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवले आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच सत्ताधाऱ्यांकडून आत्ता तरी शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याची अपेक्षा नाही. कारण हे सरकार निर्दयी झाले आहे. शेतकऱ्यांसोबत उभे रहाणे गरजेचे आहे. त्यांना जाऊन धीर देणे एवढे जरी केले तरी पुरेसे आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आमदार सचिन आहिर (MLA Sachin Ahir) जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com