PhotoGallery : जनता कर्फ्युला नाशिककरांचा संमिश्र प्रतिसाद

व्यापाऱ्यांची दुकाने बंद, नाशिककर बाहेर
PhotoGallery : जनता कर्फ्युला नाशिककरांचा संमिश्र प्रतिसाद

नाशिक | Nashik

नाशिक सिटीझन फोरम ने जाहीर केलेल्या जनता कर्फ्युला नाशिककरांनी संमिश्र प्रतिसाद दिला.

शहरामध्ये करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नाशिक सिटीझन फोरम व विविध संघटनांनी एकत्र येत जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर आजपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. परंतु सकाळपासूनच नाशिककर बाहेर पडतांना दिसले. तर व्यापाऱ्यांनी पूर्णतः जनता कर्फ्युस पाठिंबा दिल्याचे दिसून आले.

काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून आशा ठिकाणी देखील नागरिकांना अडवण्यात आले. तर रामकुंडावर नागरिकांची गर्दी दिसून आली. अनेकजण उन्हाचा चटका जाणवत असल्याने रामकुंडात पोहतांना दिसले. त्यामुळे पहिल्याच दिवशी जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार, भद्रकाली, आरके आदी ठिकाणी तुरळक वर्दळ व किराणा दुकान दिसून आली.

तर या बाजारपेठांमधील व्यापारी दुकाने बंद होती. त्यामुळे जनता कर्फ्यु इतर नाशिककरांसाठी नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे हा जनता कर्फ्यु किती यशस्वी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com