टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा गैरवापर केल्यास गुन्हा दाखल करणार - जिल्हाधिकारी मांढरे

इंजेक्शन वापराची होणार तपासणी
टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा गैरवापर केल्यास गुन्हा दाखल करणार - जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

रुग्णालयांमध्ये टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा गैरवापर होत नाही ना यावर अधिनस्त पथकाद्वारे तपासणी करुन आवश्यकतेनूसारच इंजेक्शनचा वापर होतो की नाही यावर लक्ष ठेवावे अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालय व नाशिक आणिमालेगाव महापालिका आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच इंजेक्शनचा दुरुपयोग होत असल्यास सबंधित रुग्णालयाविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करावे असे स्पष्ट आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

करोना उपचारात महत्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडिसिव्हरच्या काळाबाजाराच्या प्रकारानंतर जिल्हाप्रशासनाने धडा घेत टोसिलिझुमॅब इंजेक्शनच्या बाबतीत हा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत पावले उचलली आहे. टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा दुरुपयोग टाळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सूचना जारी केल्या आहेत.

रेमडिसिव्हर नंतर टोसिलिझुमॅब इंजेक्शनची मागणी वाढत आहे. रुग्णालयांमध्ये टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा वापर योग्य पध्दतिने होतो की नाही यावर अनधिस्त पथकाकडून तपासणी करुन घ्यावी. ज्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन देण्यात आले त्याचा वापर न झाल्यास सबंधित रुग्णालयांनी ते जतन करावे.

कोणत्याही परिस्थितीर त्याचा काळाबाजार होत‍ा कामं नये. इंजेक्शन परस्पर दुसर्‍यांना देता कामं नये. तसेच इंजेक्शनचा वापरावर निगराणी ठेवण्यासाठी रुग्णालयांनी जिल्हाप्रशासनाने दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात इंजेक्शनची माहिती भरावी व त्याबाबत फलकावर माहिती लिहावी. तसेच संगणीकृत एक्सलशीटमध्ये माहिती फाईलिंग करावी. जेणेकरुन तपासणीसाठी अधिकारी आल्यास त्यांना तत्काळ ही माहिती सादर करावी. इंजेक्शनच्या वापरात गैरप्रकार आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दोषी रुग्णालयांविरुध्द गुन्हे दाखल केले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com