भाजपकडून सुडाचे राजकारण

जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
भाजपकडून सुडाचे राजकारण

जानोरी । वार्ताहर Janori

‘भाजप सरकार (BJP government) राज्यातील शासनातील मंत्रांना बदनाम करण्यासाठी ईडीचा (ED) गैरवापर करत असून असेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत केले. परंतु न्यायालयाने भुजबळ यांना निर्दोष सिद्ध केले.

भाजप विकासावजी सुडाचे राजकारण (Politics) करत आहे. पुढील काळात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) योजना जनतेपर्यंत पोहचून नगरपंचायत, जिल्हा परिषद (Zilha Parishad), पंचायत समिती निवडणूका (Panchayat Samiti elections) जिंकण्यासाठी सज्ज रहावे’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रे निमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दिंडोरी (Dindori) येथील संस्कृती लॉन्स येथे दिंडोरी- पेठ मतदारसंघातील (Dindori-Peth constituency) राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता संवाद सोहळा पार पडला. त्यावेळी पाटील बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal), राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी खासदार समिर भुजबळ (Former MP Sameer Bhujbal), रायुकॉ प्रदेशाध्यक्ष महेबूब पटेल,

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद पगार, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, बाळासाहेब जाधव, अनिल देशमुख आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, पूर्वी काँग्रेस सोबत आघाडी होतीच आता शिवसेना (Shiv Sena) राज्यातील सत्तेत सोबत आहे सर्वांनी एकत्र येत लढले पाहिजे असा मतप्रवाह आहे

तरीही सर्वांनी बूथ पातळीवरून पक्षाचे मजबूत संघटन करावे स्वतःची मजबूत ताकत उभी करावी व पुढील सर्व निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिंडोरी - पेठ तालुक्यातील सर्व कार्यकारिणीची हजेरी घेतली.

पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांकडून समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, युवक तालुकाध्यक्ष शाम हिरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उफाडे, डॉ. घनशाम जाधव, नरेश देशमुख, महिला तालुकाध्यक्ष संगीता राऊत, पेठ तालुकाध्यक्ष दामू राऊत, पेठ युवक तालुकाध्यक्ष गिरीश गावित आदी विविध सेलच्या तालुकाध्यक्ष यांनी कार्यकारिणीचा आढावा दिला. यावेळी दिंडोरी व पेठ तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. योगेश गोसावी यांनी केले.

Related Stories

No stories found.