२० मोबाईल डिस्पेनसरी व्हॅनच्या माध्यमातून राबविणार "मिशन झिरो नाशिक"

आजपासून या मोहिमेचा शुभारंभ
२० मोबाईल डिस्पेनसरी व्हॅनच्या माध्यमातून राबविणार "मिशन झिरो नाशिक"
मिशन झिरो नाशिक

नाशिक । Nashik

करोना विरूध्दच्या लढाईत यशस्वीपणे कोरोनाचा सामना करण्यासाठी २० मोबाईल डिस्पेनसरी व्हॅन च्या माध्यमातून "मिशन झिरो नाशिक" ही महत्वपूर्ण व उपयोगी एकात्मिक कृती योजना भारतीय जैन संघटना- बीजेएस व वाॅटरग्रेस कं. तसेच नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने व शहरातील विविध स्वयंसेवी संस्था व व्यक्तींच्या बरोबरीने आजपासून या मोहिमेचा शुभारंभ झाला.

यावेळी मा. ना. श्री छगनराव भुजबळ, पालकमंत्री, मा. श्री सतीश नाना कुलकर्णी, महापौर,नाशिक, मा. श्री शांतीलाल मुथ्था, संस्थापक भारतीय जैन संघटना आदी मान्यवर उपस्थित होते. मिशन झिरो नाशिक ही महत्वपुर्ण व उपयोगी एकात्मिक कृती योजनेचा शुभारंभ महाकवी कालीदास कलामंदीरात जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री. छगन भुजबळ, शांतीलाल मुथा, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन्सला स्वयंसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचे मंडल पदाधिकारी ,शहर पदाधिकारी ,नगरसेवक व आमदार व्यक्तिश: उपस्थित राहून नागरीकांची आरोग्य सेवा करणर आहेत.

या मोहिमेतंर्गत २० मोबाईल डिस्पेनसरी व्हॅन द्वारे ताप असणारे रूग्ण तसेच करोना सदृष्य रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरभर संशयित रुग्णाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामुळे करोनाला अटकाव करण्यात मदत होईल. झिरो मिशन अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांमध्ये मा.महापौर सतिश नाना कुलकर्णी यांनी मुंबई येथील धारावी परिसर कोरानामुक्ती कडे वाटचाल करीत असतांना त्याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली आहे.

निओडॉट (NEODOT) या कंपनी व्दारे मनुष्याच्या शरीरावर डॉट (टिकली) लावली असता मनुष्याचे शरीराचे तापमान २४X७ मोजण्यास मदत करतो. असे निदर्शनास येऊन त्यांचेवर तात्काळ उपचार करणे सोपे होणार असल्याने नाशिक शहरातील विशेष करुन झोपडपटटी परिसर , दाट लोकवस्तीचा परिसर तसेच प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिक तसेच करोनाच्या लढाईत कार्यरत मनपा कर्मचारी यांचे स्वास्थ उत्तम रहावे यासाठी त्यांना निओडॉटचे वितरण महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

मध्यमवर्गीयांना हे निओ डॉट स्वखर्चाने शहरातील मनपा मान्यताप्राप्त स्टॉल्सवरुन घ्यावे लागणार असून निओडॉटचे नियंत्रण स्वतंत्रपणे संगणकाव्दारे होणार असल्याने नाशिक शहरातील करोनाबाधीतांची व त्यावर तात्काळ उपचार होणार असल्याने नाशिक शहर निश्चितच झिरो मिशन अर्थात कोरानामुक्त होण्याकडे वाटचाल करणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com