अनाथ, विधवांसाठी 'मिशन वात्सल्य'

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी| Nashik

‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ (Mission Vatsalya) ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अनाथ बालकांना (orphans) प्रत्येकी ५ लाख तर विधवांना (Widow) दरमहा एक हजार रुपये देण्यात येत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अनिल दौंडे (Anil Daunde) यांनी दिली...

नाशिकच्या पंचायत समिती कार्यालय सभागृहात मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. यावेळी एकल व विधवा महिलांनी शासकीय लाभ मिळवण्यासाठी येत असलेल्या समस्या कथन केल्या.

यावेळी दौंडे यांनी यापुढील काळात कोणतीही अडचण आल्यास कार्यालयात येवून आपल्या कामाची दखल घेवून त्यावर लागलीच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दौंडे यांनी मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात देण्यात आलेल्या लाभांची माहिती दिली.

नाशिक महापालिका (Nashik NMC) क्षेत्रात दोन्ही पालक गमावलेल्या १९ अनाथ बालकांपैकी १५ बालकांना बालसंगोपन योजनेतून प्रत्येकी ५ लाखाचा लाभ देण्यात आला. तसेच नाशिक शहर ६०५ व ग्रामीण ६५ अशी एकूण एकल व विधवा ६७० कुटूंबे असून १९ कुटूंबांच्या वारसांना राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत प्रत्येकी वीस हजार रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

अन्य लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम सुरु असून विधवांची ७० प्रकरणे मंजूर करून प्रत्येकी दरमहा एक हजार याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यासाठी तहसीलदार श्वेता पाटोळे, धान्य वितरण अधिकारी चंद्रशेखर पगारे, खेडकर, नलिनी सोनवणे, दिपाली गवळी, बालविकास प्रकल्प अधिकारी अजय फडोळ, बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. सारिका बारी, सुधीर सातपूते, ज्योती देशमूख, अश्विनी आहेर, विजया कांडेकर आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com