मिशन ऑक्सिजन : ‘जीपीएस’ लावलेले २५० टँकर धावताय रस्त्यावर

मिशन ऑक्सिजन :  ‘जीपीएस’ लावलेले २५० टँकर धावताय रस्त्यावर
File Photo

नाशिक | प्रतिनिधी

ऑक्सिजन वाहतुकीसाठी राज्याच्या परिवहन विभागाने विविध भागांतून नायट्रोजन आणि ऍरगॅानच्या वाहतुकीचे ८० ते ८५ टँकर ताब्यात घेतले आहे. सध्या २५० टँकरद्वारे ऑक्सिजन वाहतूक केली जात असून, या वाहतुकीवर 'जीपीएस'द्वारे नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजनसोबत नायट्रोजन आणि ऍरगॅान ही उपउत्पादने निघतात. या प्रत्येक वायूच्या वाहतुकीसाठीच्या टँकरच्या रचनेत तांत्रिक भिन्नता असते. ऑक्सिजन वाहतुकीसाठी काही आरटीओंच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऑक्सिजन टँकर तातडीने अधिग्रहित करण्यात आले. हे टँकर कमी पडू लागल्याने नायट्रोजन आणि अॅरगॅानच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे टँकर ऑक्सिजन वाहतुकीसाठी वापरण्याचा निर्णय झाला. त्यासाठी आरटीओ निरीक्षक नेमून त्या टँकरमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले. त्यामुळे ऑक्सिजन वाहतुकीसाठी अडीचशे टँकर उपलब्ध झाले आहेत.

सुरुवातीला ऑक्सिजन टँकरच्या वाहतुकीचा ताळमेळ बसत नव्हता. कोणता टँकर कुठे आहे? वेळेमध्ये पोहोचला का? परतीचा प्रवास सुरू झाला का? ही सर्व माहिती मिळवणे आणि त्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे यासाठी सर्व टँकरना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्याचा नियंत्रण कक्ष मुंबईला परिवहन आयुक्त कार्यालयात केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com