‘मिशन कवच कुंडल’ यशस्वी करणार

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांचा निर्धार
‘मिशन कवच कुंडल’ यशस्वी करणार
देशदूत न्यूज अपडेट

जानोरी । वार्ताहर Janori

महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) सुरु केलेल्या ‘मिशन कवच कुंडल’ (Mission Kavach Kumdal) मोहिम यशस्वीपणे राबवण्याचा संकल्प आरोग्य विभागाने (Department of Health) केला असून नागरिकांनी त्याला प्रतिसाद देत सर्वांनी कोविड लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले.

राज्य शासनाने तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के करण्यासाठी कालपासून शहरी व ग्रामीण भागात मिशन कवच कुंडन मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी होवून आरोग्य विभागाने दिंडोरी तालुका (Dindori Taluka) 100 टक्के लसीकरण युक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. दिंडोरी तालुक्यात साधारणपणे 2 लाख 66 हजार नागरिकांना लसीकरण देणे अपेक्षित होते.

त्यापैकी 1 लाख 50 हजार नागरिकांना प्रथम लस व 50 हजार पर्यंत दुसरे लस देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आली आहे. राहिलेल्या लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी मिशन कवच कुंडलचे आयोंजन करण्यात आले असून जे लोक लसीकरणापासून वंचित आहे अश्यांसाठी प्रत्येक गावस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून राहिलेल्या लोकांनी त्यात सहभागी होवून आपले लसीकरण करुन घेवून आपल्याबरोबर आपल्या कुटूंबाचेही संरक्षण करणे अपेक्षित आहे.

‘मिशन कवच कुंडल’ यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी (Medical officer), आरोग्य सहाय्यक (Health Assistant), आरोग्य सेविका (Health worker), आरोग्य सेवक, आशा गटप्रवर्तक, आशा कार्यकर्ता आदी आरोग्य कर्मचारी सज्ज झाले असून दिंडोरी तालुका पूर्ण लसीकरण युक्त करणे हा आमचा संकल्प आहे. करोना सारख्या महाभयंकर रोगापासून आपले संरक्षण करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याने कोणताही गैरसमज मनात बाळगता नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे,

यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी गावागावातील राजकीय, सामाजिक व धार्मीक आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे व आपला तालुका लसीकरण युक्त करुन दिंडोरी तालुका करोना मुक्तीकडे नेण्यासाठी मदत करावी, असे प्रशासनाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.