'या' दिवसापासून सुरु होणार ‘मिशन भागीरथ प्रयास’ उपक्रम

'या' दिवसापासून सुरु होणार ‘मिशन भागीरथ प्रयास’ उपक्रम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दरवर्षीं दुष्काळात पिण्यासाठी टँकरने (tanker) पाणी पुरवठा (water supply) करण्याचे दुष्काळी गावातील चित्र पालटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी

जिल्हा टँकरमुक्त करण्याचा (district tanker free) संकल्प करत, ‘मिशन भागीरथ प्रयास’ (Mission Bhagirath Prayas) हाती घेतले आहे. त्याचा शुभारंभ 23 फेब्रुवारीला पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या हस्ते होणारआहे.

या कार्यक्रमास संंबंधीत गावातील सरपंंचांना पाचारण केले असुन त्यांच्या सक्रीय सहभाग यात घतेला जाणार आहे. या मिशन अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme) जिल्ह्यात जलसंधारणाची सुमारे 600 कामे हाती घेतली आहेत.

या कामांची रक्कम जवळपास 100 कोटी रुपये असून या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 12 तालुक्यांमधील 150 गावांमध्ये पाच ते 30 लाख रुपयांच्या दरम्यान बंधारे (dams) बांधले जाणार आहेत. या नंतर प्रत्यक्षा कामला सुरवात होणार असुन मे अखेर कामे पुर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात किती पाणी साठले यावरुन या योजनेचे फलीत समोर येणार आहे.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी सुरगाणा तालुक्याचा (surgana taluka) दौरा करत माहिती घेतली. त्यावेळी सुरगाणा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या सर्व विभागांना दिल्या असून तो आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

56 गाव पाणी पुरवाठा योजनेकडे (56 village water supply scheme) 11 कोटी रुपयांंची थकबकी असुन ती त्यांनी 15 माचर्र् पर्यंत भरावी अन्यथा कठोर निर्णय घेेतला जाईाल. असा इशारा मुख्य कार्यकरी अधीकारी अशीमा मित्तल यांनीदिला आहे. दर वर्ष ही पाणी पट्टी ्थकत राहते. त्यामळे देखभाल दुरस्तीला अडथळे येतात. पैशा अभावी कामे करता येत नाही.त्यामुळे आता थकबीकी वसुलीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com