स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात टवाळखोरांचा धुडगूस

स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात टवाळखोरांचा धुडगूस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव (Swatantryaveer Savarkar Swimming Tank) येथे सायंकाळच्या वेळी काही तरुणांनी आतमध्ये असभ्य वर्तन करत येथील सामानाची नासधूस केल्याचा प्रकार घडला. मात्र याबाबत प्रशासनाने अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल केला नाही मात्र पोलिसांकडे (Police) तरण तलावावर बंदोबस्ताची मागणी केली आहे....

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाने नाशिक शहरातील जलतरण तलाव शहरवासीयांसाठी खुले केले. गुरुवार (दि.21) सायंकाळच्या वेळी काही तरुणांनी तरण तलावाच्या आत प्रवेश करत येथे असलेल्या सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली.

तसेच याठिकाणी महिला असल्याचे भान ठेवत असभ्य वर्तन देखील केले. परिसरात असलेल्या झाडांच्या कैऱ्या तोडून एकमेकांना मारत हे तरुण जणू काही दहशत माजवण्याचा प्रकार याठिकाणी करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हे तरुण एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तरण तलावाच्या आत असलेल्या सामानाची नासधूस देखील केली. हा प्रकार समजताच आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी तरण तलावाला भेट देत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.

तसेच संबंधित तरुणांवर मनपा (NMC) प्रशासनाने गुन्हा दाखल करावा असे देखील सूचित केले. जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही व येथे येणाऱ्या सर्वांनाच सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

या प्रकाराबाबत तरण तलावाच्या अधिकाऱ्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police Station) गाठत फक्त घडलेल्या प्रकाराची माहिती देत पोलीस संरक्षण मागितले.

मात्र या प्रकाराबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली नाही. दरम्यान मनपा प्रशासनाने संबंधित तरुणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रत्यक्षदर्शींकडून होत आहे.

पोलीस प्रशासनातर्फे या ठिकाणी क्यू आर कोड बसवावा व गस्त वाढवावी. तसेच तरण तलावाची मनपातर्फे तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करून या ठिकाणी आमदार निधीतून जी काही मदत लागेल ती आम्ही करू.

देवयानी फरांदे, आमदार

Related Stories

No stories found.