दशक्रिया विधी शेड नसल्याने नागरिकांची परवड

दशक्रिया विधी शेड नसल्याने नागरिकांची परवड

म्हाळसाकोरे । वार्ताहर Mhalsakore-Dindori

म्हाळसाकोरे (Mhalasakore) येथे मृत्युशय्येनंतर जो दशक्रिया विधी (Dashakriya Vidhi) पार पडतो. तो गोदावरी (godavari) उजव्या तट कालव्याच्या काटेरी वनात उघड्यावर होतो. ऊन, वारा, थंडी, पाऊस सहन करत कोठे तरी झाडाचा आधार घेत संपन्न होतो. या ठिकाणी दशक्रिया शेड नसल्याने येणार्‍या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

म्हाळसाकोरे येथील दशक्रिया विधी गावापासून लांब दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी उजव्या तट कालव्यावर पाच मोर्‍या येथे संपन्न करण्याची प्रथा आहे. अनेक लोकांनी तो बदलून गावात करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी कडवा कालव्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तेथे काकस्पर्श (Kaksparsh) होत नसल्याने पुन्हा तो गोदावरी उजव्या कालव्यावरच ठेवत आहे.

पण तेथे लोकांना बसण्यासाठी निवारा शेड (shed) नसल्याने कुणी कुठे ही बसते. ट्रॅक्टरच्या (Tractor) ट्रॉलीत महाराजांना बसवत ग्रामस्थ प्रवचन ऐकत असतात. वीजेची सोय नसल्याने माईकसाठी (Mike) बॅटरी (Battery) चा वापर केला जातो. चोहोबाजूंनी हा परिसर काटेरी झुडपांनी व्यापला आहे. जागेचे सपाटीकरण नाही. पावसाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी असते त्यामुळे बसायला जागा शोधावी लागते.

कधी कालव्याला पाणी नसल्यास गावातून टँकर भरुन न्यावा लागतो. पिंड ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्याने लवकर काकस्पर्श होत नसल्याने लोकांना कित्येक वेळ बसावे लागते. कधी पावसाची झड लागली तर दशक्रिया करण्यास खूप अडचणी निर्माण होतात. थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत बसावे लागते. शेड उभारण्यासाठी तेथे सर्व खासगी मालकीच्या जागा आहे.

अनेकदा त्यांना मनावण्याचा प्रयत्न झाला पण तो फोल ठरला. येथे पाटबंधारे विभागाची (Irrigation Department) कालवा (Canal) सोडून शंभर फुट हद्द आहे. गावाने ठरवले तर तेथे शेड उभे राहू शकते. पण याकामी पुढाकार कोण घेणार हा एक प्रश्न आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन दशक्रियेसाठी शेड उभारुन ग्रामस्थांची परवड थांबवावी. मृत्यूशय्येनंतर दशक्रिया विधीसाठी मोठ्या यातना भोगाव्या लागत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. पावसाळ्यात कालव्याकडे जाण्याचा रस्ता अतिशय खडतर बनतो.

अनेक शेतकर्‍यांनी रस्ते खोदून कालव्यावरुन पाईपलाईन केल्या आहे. त्यांच्या नळ्या तशाच ठेवतात त्यामुळे अपघाताला कारण मिळते. त्यामुळे किमान पाईपलाईन खोदलेल्या जागी मुरुम टाकून बुजविणे गरजेचे आहे. भारत पेट्रोलियम कार्यालयाला या रस्त्याची नेहमी गरज पडते. पेट्रोलिंगसाठी नेहमी गाड्या फिरत असतात. त्यामुळे त्यांनी याची दखल घेऊन सदर रस्त्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे.

पाटबंधारे विभागाने जागा दिल्यास शेडचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून येथील दशक्रिया विधी हे कालव्यालगत होत असतात. परंतु तेथे ग्रामपालिकेची कुठल्याही प्रकारची जागा नाही. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी शेड बांधायचे झाल्यास जागा लागणार आहे. त्यामुळे त्या संदर्भात पाटबंधारे विभागाकडे जागेची मागणी पत्राद्वारे केली आहे. परंतु पाटबंधारे विभाग भाडेतत्वावर जागा देणास तयार आहे. परंतु शेड बांधायचे झाल्यास ग्रामपालिकेला सदर जागा कायमस्वरुपी हवी आहे. त्यामुळे तसे पत्र पाटबंधारे विभागाला दिले असून त्यांचा होकार आल्यानंतर लगेच शासन दरबारी प्रस्ताव पाठवून दशक्रिया विधी शेडसाठी निधी उपलब्ध केला जाईल.

कल्पेश बरु, ग्रामविकास अधिकारी (म्हाळसाकोरे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com