
नाशिक । Nashik
मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Agra Highway) धुळे ते शिरपूर (Dhule) या रस्त्यावर काल गव्हाणे फाट्याजवळ (Gavane Phata) झालेल्या भीषण अपघातात नाशिकच्या (Nashik) संदीप चव्हाण व मिना चव्हाण यांच्यासह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच या अपघातात चव्हाण यांच्या दोन मुली व मुलगा गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील एका मुलीचा आज उपचारावेळी मृत्यू (death) झाला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, काल शिरपूर (Shirpur) येथे कानुबाईचा उत्सव आटोपून नाशिककडे येत असताना हा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात चव्हाण दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर चव्हाण यांच्या दोन मुली व मुलगा यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आज परी संदीप चव्हाण (६) (Pari Sandeep Chavan) हिचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.
दरम्यान, चव्हाण कुटुंबातील इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आज सायंकाळी मयत तिघांवर मोरवाडी अमरधाम (Morwadi Amardham) येथे अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.