अल्पवयीन मुलीचे पोलिसाने केले अपहरण

अल्पवयीन मुलीचे पोलिसाने केले अपहरण

नाशिक। प्रतिनिधी Nashik

ओळखीचा फायदा घेत म्हसरूळ (Mhasrul Area) परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबियांच्या घरातील अल्पवयीन मुलीला (minor girl) शहर पोलीस दलातील (city police force) एका कर्मचाऱ्याने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी (Police) तातडीने चक्रे फिरवत पोलीस कर्मचाऱ्याला आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर अपहरणाचा गुन्हा (crime of kidnapping) नोंदवला आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि १३) रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविला होता. काल (दि १२) पासून मुलगी बेपत्ता असल्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली होती.

याबाबत वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी तातडीने मुलीचा शोध घेण्यासाठी पथक नेमले. पथकाने तातडीने मुलीचे फोन रेकॉर्ड (Phone records) आणि टॉवर लोकेशन (Tower location) घेत माग काढला.

अपहरण झालेली मुलगी आणि तिला घेऊन जाणारा संशयित पोलीस कर्मचारी दीपक जठार (Police personnel Deepak Jathar) याला चारचाकी वाहन क्रमांक एमएच १५ इ डब्लू ९९९० या वाहनासह नांदूर नाका परिसरातून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलीचे मेडिकल करण्यासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यात काही आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर आणखी कलम लावण्यात येणार आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com