जुनवनेवाडी रस्त्याला मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडून हिरवा कंदील

जुनवनेवाडी रस्त्याला मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडून हिरवा कंदील

घोटी | प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील तळोघ ग्रामपंचायत मध्ये असलेल्या जुनवनेवाडी एका मातेला आपल्या बाळासह जीव गमवावा लागला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या वाडीला जाण्यासाठी येथील ग्रामस्थांना पायापीट करावी लागत आहे.

त्या घटनेची दखल घेत माजी आमदर काशिनाथ मेंगाळ यांनी तात्काळ आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांची भेट घेत जुनवनेवाडीचा चार किलोमीटर रस्ता तात्काळ करावी अशी मागणी करून निवेदन दिले आहे व ना.विजयकुमार गावीत यांनी याबाबत हिरावा सिग्नल देत सबंधित विभागाला सूचना देखील दिल्या आहेत.

त्यामुळे जुनवनेवाडी ला ७० लाखांचा निधी देण्यात येईल अशी देखील माहिती ना विजयकुमार गावीत यांनी दिली आहे. दरम्यान माजी आमदर काशिनाथ मेंगाळ यांनी पाठपुरावा केल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार माणण्यात आले आहे. यावेळी माजी आमदर धनराज महाले,माजी आमदर पांडुरंग गांगड, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख संपत काळे, ज्ञानेश्वर जमधडे आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com