राज्यमंत्री कडू यांची सावरकर स्मारकास भेट

राज्यमंत्री कडू यांची सावरकर स्मारकास भेट

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

नाशिक दौर्‍यावर आलेले राज्यमंत्री बच्चू कडू Minister of State Bachchu Kadu यांनी भगूर Bhagur येथील सावरकर स्मारकाला Sawarkar Smarak भेट देत सावरकरांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होताना त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाच्या वतीने मनोज कुवर यांनी बच्चू कडू यांचे स्वागत करून स्मारकाची माहिती दिली.

तसेच त्यांना ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक भेट दिले. याप्रसंगी कडू यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या संपूर्ण कुटुंबाची आहुती देणारे सावरकर हे एकमेव कुटुंब होते. स्वातंत्र्यलढ्याचे ते प्रेरणास्त्रोत असून रक्तरंजीत लढ्याचे सैनिक असलेल्या सावरकरांना आपण मानाचा मुजरा करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा अनिता करंजकर, विक्रम सोनवणे, अंबादास कस्तुरे, नगरसेवक संजय शिंदे, उत्तम आहेर, फरीद शेख, संग्राम करंजकर, शाम ढगे, संजय जाधव, निमिष झंवर, नितीन करंजकर, वैभव ढगे, पांडुरंग आंबेकर, प्रमोद घुमरे, शेखर जाधव, संभाजी देशमुख, चेतन आंबेकर, प्रकाश सुराणा, मनोज कुवर, सुरेश बोराडे, प्रशांत लोया, संभाजी देशमुख आदी उपस्थित होते.

यानंतर बच्चू कडू यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी स्वागत केले. यावेळी भगूर न. पा. नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून भगूर नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असून भगूर शहराच्या झालेल्या विकासाबाबत कडू यांना माहिती देण्यात आली. याशिवाय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समस्या व प्रलंबित प्रश्नांसंबंधी निवेदन देण्यात आले. यावेळी रंगनाथ करंजकर, रोहित करंजकर, संग्राम करंजकर, काका करंजकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com