पर्यावरण राज्यमंत्र्यांचा हेरिटेज सह्याद्रीसाठी पुढाकार

पर्यावरण राज्यमंत्र्यांचा हेरिटेज सह्याद्रीसाठी पुढाकार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सह्याद्री संरक्षणाचा हा प्रस्ताव proposal of Sahyadri protection मी स्वतः मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री यांना पाठवितो असे ठाम आश्वासन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे Minister of State for Environment Sanjay Bansode यांनी दिले.

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवसा International Disaster Relief Day निमित्त ब्रह्मगिरी कृती समितीचे Bramhagiri Kruti Samiti ज्येष्ठ सदस्य रमेश अय्यर यांच्या संकल्पनेतून व निशिकांत पगारे यांच्या पुढाकाराने ब्रह्मगिरी व ब्रह्मगिरीपर्वत रांगेतील डोंगर फोडून होत असलेले उत्खनन थांबवण्यासाठी जातीने पुढाकार घेऊन ब्रम्हगिरी, सह्याद्री पर्वताचे रक्षण करणार्‍या पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा ब्रम्हगिरी रक्षक सन्मान 2021 सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ब्रह्मगिरी कृती समितीच्या वतीने शिवस्वरूप ब्रह्मगिरीचे छायाचित्र असणारे मानचिन्ह देऊन बनसोड यांचे आभार मानण्यात आले. नाशिक ब्रह्मगिरी व ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील डोंगर फोडून होत असलेले उत्खनन माननीय पर्यावरण राज्यमंत्री यांच्या पुढाकाराने आता नक्कीच कायमस्वरूपी थांबेल. याबरोबरच यासाठी नाशिक येथील बेलगाव ढगा व मातोरी सारख्या जागरूक ग्रामसभा आहेतच.

ब्रह्मगिरी बरोबर महाराष्ट्रातील सह्याद्रीपर्वत रांगेत डोंगर फोडून होत असलेले उत्खनन कायमस्वरूपी थांबविण्यासाठी 50 वर्षाचे झाडे हेरिटेज करण्याचा गौरवास्पद निर्णय घेणार्या सरकारने 2 ते 6 कोटी वर्षांपूर्वीची सह्याद्री पर्वतरांग हेरिटेज घोषित करावी. अशी विनंती राज्यमंत्र्यांना करण्यात आली. याबाबत मी सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. हा प्रस्ताव मी स्वतः मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री यांना पाठवितो असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी रमेश अय्यर, निशिकांत पगारे, हभप. शांताराम दुसाने, मनोज साठे, प्रकाश बेळे व तुषार गायकवाड उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com