जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड
नाशिक

श्रीराम नावाचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही...

जितेंद्र आव्हाड : भाजपला टोला

Kundan Rajput

नाशिक । Nashik

गेली चाळीस वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केले हे अख्ख्या जगाने पाहिले. पण श्री राम कोणाच्या सातबार्‍यावर नाही. राम मंदिराचा सातबारा कोणाच्या मालकिचा नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला.

सिडकोतील सिंहस्थ नगर येथील मनपाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे रविवारी (दि.२) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी पत्रकारांनी राम मंदिराच्या प्रश्नावर छेडले असता त्यांनी भाजपला टोला हाणला.

करोनामुक्त भारत व महाराष्ट्र घडो हिच श्रीराम चरणी प्रार्थना. प्रभू श्रीराम चंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र आहे.

माझा जन्म नाशिकचा आहे. श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळं. गेल्या ४० वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं हे अख्ख्या जगाला माहित आहे.

राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकले, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं. प्रामाणिकपणा व मर्यादा हे प्रभु रामाचे गुण घ्यावे असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com