गुरुद्वाराचे पावित्र्य व नावलौकिक पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - भुसे

गुरुद्वाराचे पावित्र्य व नावलौकिक पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - भुसे

मालेगाव | Malegaon

नांदेड नंतर मनमाड (Manmad) येथील गुरुद्वारा (Gurudwara)हे शिख (Sikh) धर्मियांचे महाराष्ट्रातील (Maharashtra) पवित्र क्षेत्र असून या गुरुद्वाराचे पावित्र्य व नावलौकिक पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी केले...

शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक (Guru Nanak) यांच्या जयंतीनिमित्त शिख बांधवांना भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. मनमाड येथील गुरुद्वारात गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त दादा भुसे यांच्या उपस्थित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) अपर पोलीस अधीक्षक सुनिल कडासने (Sunil Kadasne) पोलीस उपअधीक्षक समरकुमार साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, गुरु रणजितसिंह, गुरुजितसिंग कांत यांच्यासह शिख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुसे पुढे म्हणाले की, करोना (Corona) काळात या गुरुद्वारामध्ये असलेल्या अन्नछत्रच्या माध्यमातून गरजूंना व गोरगरीबांना अन्न मिळाले आहे. त्याबरोबरच येथे होणारे सामाजिक उपक्रम देखील निश्चितच कौतुकास्पद असून त्याची दखल घेण्यात आली आहे. या भागातील विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याकडे पाठपुरावा करुन त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी भुसे यांनी दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गुरुद्वाराच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी आमदार कांदे यांनी पाठपुरावा केला असून त्यासाठी यापुढेही काम करण्यात येईल. तसेच यावेळी कांदे यांनी शिख बांधवाना गुरुनानक जयंतीनिमित्त (Guru Nanak Jayanti) शुभेच्छा दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com