काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाद फक्त पडद्यावरचे

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा मिश्किल टोला
काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाद फक्त पडद्यावरचे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काँग्रेस-राष्ट्रवादीचे (Congress-NCP) वाद फक्त पडद्यावरचे आहेत; असले वाद फक्त माध्यमांसमोर दाखविण्यासाठी असतात. अंतर्गत सर्व काही व्यवस्थित आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi government) सत्तेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. हा संघर्ष फक्त मीडियावर दिसणारा आहे; राजकीय लोकांचे कोणते वाद खरे असतात का? असा मिश्किल टोला राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bacchu Kadu) यांनी लगावला...

चार वर्षांपूर्वी महापालिकेत अपंगांच्या प्रश्नाबाबत आयुक्तांसोबत झालेल्या वादावरून बच्चू कडू यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी आ. बच्चू कडू आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात (Nashik District Sessions Court) हजर होते. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

२०१७ ला नाशिक महापालिकेवर (Nashik NMC) प्रहार संघटनेच्या (Prahar Sanghatana) नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. यावेळी अपंगांचा पाच टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असताना निधी खर्च का झाला नाही, याचा जाब विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू अपंगांच्या शिष्टमंडळासह पालिकेत आले होते.

याबाबत वादविवाद झाले होते, त्यानंतर आ. बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही करण्यात आली होती. मागच्या वेळी असलेल्या जामीनदाराचे निधन झाले आहे, आता नवीन जामिनासाठी ते कोर्टात आले होते.

पुढच्या तारखेला आढावा

पुढच्या तारखेला जेव्हा न्यायालयात तारीख मिळेल तेव्हा पुन्हा हजर होईल. मात्र त्यावेळी महापालिका जिल्हा परिषद आणि जिल्हापरिषद यांच्या वतीने होत असलेल्या अपंगांच्या विकासकामांचा आढावा घेणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com