दिंडोरी नगरपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतन

दिंडोरी नगरपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतन

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी नगरपंचायतीच्या (Dindori Nagar Panchayat) कर्मचार्‍यांना प्रशासनाने किमान वेतन लागू केले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले असून याकामी दैनिक देशदूतनेही सातत्याने पाठपुरावा केल्याने कर्मचार्‍यांनी देशदूतचे आभार मानले आहे.

सन 2015 साली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. त्यानंतर ग्रामपंचायत कालीन कर्मचार्‍यांचे समावेशन झाले नाही. तथापी त्यांना किमान वेतन लागु होणे आवश्यक होते. त्यामुळे दिंडोरी नगरपंचायत कर्मचार्‍यांनी कामगार उपायुक्तांकडे (Deputy Commissioner of Labor) तक्रार अपिल दाखल केले.

दिंडोरी कामगारांची बाजु न्याय्य असल्याने कामगार उपायुक्तांनी नगरपंचायत प्रशासनाला पाचारण केले. त्यानंतर कामगार उपायुक्तांनी किमान वेतन (Salary) लागु करण्याचा आदेश दिला. नगरपंचायतीने कर्मचार्‍यांची इगतवारी मागितली. त्यानंतर कामगार उपायुक्तांनी कर्मचार्‍यांची वर्गवारीही करुन दिली. तांत्रिक बाबींमुळे दिंडोरी नगरपंचायत प्रशासनाने कर्मचार्‍यांना सुूधारित किमान वेतन लागु केला नाही.

अखेरीस प्रशासनाने कर्मचार्‍यांना वेतन आयोग (Pay Commission) लागू करुन दिलासा दिला. आता कर्मचार्‍यांचा समावेशनाचा प्रश्न प्रलंबित असून अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांच्याकडे हा निर्णय लवकरच होणार आहे. कर्मचार्‍यांना वेतन लागू केल्याने दिंडोरी नगरपंचायतीवर अतिरीक्त 12 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. पण कर्मचार्‍यांच्या वेतनात दोन ते चार हजारांनी वाढ झाली आहे.

देशदूतचे मानले आभार

कर्मचार्‍यांना किमान वेतन आयोग लागू होण्यासाठी दैनिक देशदूतने वेळोवेळी कामगारांच्या व्यथा मांडल्या. कामगारांच्या समस्यांचे दखल घेवून त्या अधिकार्‍यांपर्यंत व जनतेपर्यंत पोहचवल्या.

त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat), नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde), आ. डॉ. सुधीर तांबे, कामगार उपायुक्त शिर्के, प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले यांच्याशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली होती.

मध्यंतरीच्या काळात मुख्याधिकारी नागेश येवले यांनी विशेष पुढाकार घेवून अखेर 74 कर्मचार्‍यांना वेतन आयोग लागू केला. त्यामुळे कर्मचारी वर्गाने मुख्याधिकारी नागेश येवले व दैनिक देशदूतचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com