पार्सल ट्रेनला अत्यल्प प्रतिसाद

गाडीची वेळ बदलण्याची मागणी
पार्सल ट्रेनला अत्यल्प प्रतिसाद

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

किसान ट्रेन ( Kisan Train )बंद असल्याने रेल्वे बोर्डाने देवळाली-मुझ्झफरपूर दरम्यान नुकतीच पार्सल ट्रेन सुरु केली. मात्र, प्रतिसाद कमी असल्यामुळे भुसावळ रेल्वेच्या अधिकार्‍यांनी नाशिक व पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा तातडीने दौरा केला. शेतकरी व व्यापार्‍यांना या गाडीने जास्तीत जास्त माल पाठविण्याचे आवाहन केले. शेतकरी व व्यापार्‍यांनी गाडी सकाळी अकरा ऐवजी रात्री अकराला सुरु करावी, ही व अन्य मागण्या केल्या.

भुसावळ विभागाचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अऩिल बागले, नाशिकरोडचे मुख्य वाणिज्य निरीक्षक राकेश पलाडिया, भुसावळचे पार्सल व्यवस्थापक कुणाल कुमार, नाशिकचे मालपर्यवेक्षक के. पी. खडके, पार्सल पर्यवेक्षक एम. पी. डोके, देवळालीचे डी. के. निमसे यांनी व्यापारी व शेतकर्‍यांच्या गाठीभेटी घेतल्या. नाशिकरोडला बैठक घेतली.

उद्योजक व व्यवसायाला फायदेशीर ठरणार्‍या नव्या पार्सल ट्रेनव्दारे शेतकरी, उद्योजक, व्यावसायिकांनी नाशवंत, शेतीमाल व औद्योगिक माल पाठवावा, असे आवाहन रेल्वे अधिकार्‍यांनी केले. शेतकरी व व्यापारी यांनी गाडीची वेळ बदलून ती रात्री सोडावी अशी मागणी केली. त्यावर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी गाडी रात्री अकराला सोडण्याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.

किसान ट्रेनला 50 टक्के अनुदान होते. या गाडीला 25 गाडीला अनुदान द्यावे, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली. अवकाळी पावसामुळे सध्या शेतीमाल उपलब्ध नाही. पंधरा दिवस महिनाभरात नवीन पीक आल्यानंतर आवक हळू हळू वाढेल, त्यानंतर गाडीला प्रतिसाद वाढेल असे शेतकर्‍यांनी सांगितले. उद्योजकांनीही गाडीला प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले. या गाडीचा फायदा नाशिकच्या औद्योगिक मालासाठीही होणार आहे. त्यामुळे उद्योजकांनीही गाडीला प्रतिसाद देण्याचे आवाहन रेल्वेने केले.

रेल्वेने भाड्यात सवलत द्यावी, गाडीच्या डब्यांची संख्या तसेच गाडीच्या फेर्‍यांची संख्या वाढविण्याची आदी मागण्या करण्यात आल्या. व्यापारी व शेतकरी यांच्या सुविधेसाठी नाशिकचे वाणिज्य निरीक्षक समस्यांवर अभ्यास करून अधिकाधिक माल बुक कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रकने शेतीमाला पाठवला तर या रेल्वेगाडीपेक्षा लवकर बिहारला पोहचतो. बिहारला हा माल 36 तासात पोहचता तर रेल्वेगाडी 48 तास घेते. त्यात 12 तास नाशिकरोडला माल पडून राहतो, असे 60 तास खर्ची पडतात.

या नंतर बिहारहून छोट्या बाजारांना वितरणाला पाच सहा तास लागतात. ट्रक वेळेत पोहचल्याने आठ तास भेटतात. पार्सल रेल्वेगाडीचे भाडे चार रुपये प्रति किलो आहे. रेल्वे पार्सल गाडीला सर्वात कमी दर येस रेट हा दोन रुपये, पी रेट चार रुपये प्रति किलो, राजधानी (आर) रेट सहा रुपये किलो तर लगेजाचा रेट आठ रुपये प्रतिकिलो आहे. येस रेट हा सर्वात कमी दर आकारून पार्सल ट्रेन चालवाली, अशी शेतकरी व व्यापा-यांची मागणी आहे. मात्र, रेल्वे वाहतूक वाढते तेव्हा ती पी रेट मिळतो. नवीन पार्सल ट्रेन पी रेटवर चालते. त्या एवजी येस रेट करावा, किसान ट्रेनप्रमाणे पन्नास टक्के अनुदान मिळावी, अशी मागणी व्यापारी व शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com