निफाड तहसीलदरांचा दणका; अवैध गौणखनिज वाहतुक करणाऱ्या जप्त वाहनांचा लिलाव

गौणखनिज वाहतुकीचे प्रतीकात्मक छायाचित्र
गौणखनिज वाहतुकीचे प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक | प्रतिनिधी

निफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीपात्रातून व इतर ठिकाणी अवैधरीत्या गौणखनिजांचे उत्खनन करून वाहतुक करतांना दंडात्मक कार्यवाहीनुसार सायखेडा, निफाड, लासलगाव, पिंपळगाव व ओझर पोलीस स्टेशन आवारात जप्त केलेल्या वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे...

इच्छुक व्यक्ती अथवा संस्थांनी लिलावात सहभागी होण्याचे आवाहन निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले आहे.

नदीपात्रातून अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करून वाहतुक करणाऱ्या वाहनमालकांविरूध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

ज्या वाहनमालकांनी दंडात्मक कार्यवाहीच्या आदेशातील रक्कम शासनास जमा न केल्यामुळे, अशा प्रकारच्या जप्त केलेल्या वाहनांची लिलावाद्वारे विक्री करून कार्यवाहीतील रक्कम वसूल केली जाणार आहे.

त्यानुसार 02 मार्च 2021 रोजी सायखेडा पोलीस स्टेशन येथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यत, निफाड पोलीस स्टेशन येथे जप्त केलल्या वाहनांचा लिलाव दुपारी 2.00 ते 5.00 यावेळेत करण्यात येणार आहे.

03 मार्च 2021 रोजी लासलगाव पोलीस स्टेशन येथे जप्त वाहनांचा लिलाव सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यत, पिंपळगाव पोलीस स्टेशन येथील जप्त वाहनांचा लिलाव दुपारी 1.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत व ओझर पेालीस स्टेशन येथील जप्त वाहनांचा लिलाव दुपारी 3.00 ते 4.00 यावेळेत होणार आहे.

लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली वाहने व लिलाव हातची किंमत याबाबतच्या माहितीसाठी तहसिलदार निफाड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शरद घोरपडे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com