नाशिक । प्रतिनिधी Nashik

दिल्ली येथे देश भरातील शेतकरी एकवटले असून त्यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी बिलाला विरोध केला असून मोठे आंदोलन उभारण्यात आले आहे. एमआयएम पक्षातर्फे या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. पक्षाकडून त्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकार्यांना देण्यात आले.

मागील एक आठवडयापासुन पंजाब, हरयाणा व इतर राज्यातून आलेले शेतकरी दिल्लिच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. सरकारने लोकसभा व राज्यसभेत बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके समंत करुन शेतकर्यांचा विश्वासघात केला. आंदोलन करणार्या शेतकर्यांना आतकंवादी संबोधले गेले. शेतकर्यांवर हा अन्याय असुन ही बिले रद्द करावी अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकरी बांधवांचा विरोधात असलेले कृषी विधेयक रद्द करणे, हमी भाव देणे, कर्जमुक्त करणे, 24 तास वीज पुरवठा करणे, या सर्व मागण्या साठी एमआयएम पक्षातर्फे शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी उभा आहे. या बाबत पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यानां निवेदन देण्यात आले. यावेळी एमआयएम पक्षाचे मध्य नाशिक विधानसभा महासचिव मोहसीन शाह, मध्य विधानसभा अध्यक्ष रमजान पठाण, शहर कोषाध्यक्ष मुख्तार शेख, मुजाहिद फारूखी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.