लाखोंचा रस्ता गेला चोरीला

लाखोंचा रस्ता गेला चोरीला

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मालेगाव तालुक्यातील (malegaon taluka) टोकडे गावातील 18 लाख रुपयांचा रस्ता चोरीला (Road stolen) गेल्याबाबतची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष विठोबा द्यानद्यान (Vithoba Dyandyan, District President of the Federation of Rights Activists) यांनी पोलिसांकडे केली आहे.

या प्रकरणाची इनकॅमेरा चौकशी (In-camera inquiry) व्हावी, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे (police) केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (Department of Public Works) तयार केलेल्या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेने (zilha parishad) 15 लाख रुपये दिल्याचे प्रकरण अद्याप मिटलेले नाही. तोच हा एक प्रकार समोर आल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

टोकडे ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या (Finance Commission) निधीतून मालेगाव पोलीस ठाण्याचे (Malegaon Police Station) पोलीस निरीक्षक यांच्या नावे दिलेल्या तक्रारीनुसार, टोकडे गावांतर्गत फेब्रुवारी ते मार्च 2022 मध्ये 17 लाख 84 हजार 781 रुपयांचा रस्ता तयार करण्यात आला. या कामाचे ठेकेदार सूजन पगार यांनी मुदतीत काम पूर्ण केल्यामुळे त्यांना कामाची संपूर्ण रक्कम देण्यात आलेली आहे. मात्र, गावात अशा प्रकारचा कुठलाही रस्ताच तयार करण्यात आलेला नसल्याचे विठोबा द्यानद्यान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच हा रस्ता चोरीला गेला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

सुमारे 18 लाख रुपयांचा 5 मीटर रुंद व 2 किलो मिटर लांबीचा रस्ता (road) अचानकपणे गायब कसा झाला, याची शोध घेण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार दाखल होताच ग्राम पंचायतीने (gram panchayat) आता रस्त्याचा शोध सुरु केला आहे. तर ठेकेदाराने थेट फिर्यादीशी संपर्क साधत हा रस्ता कधीच पूर्ण केल्याची माहिती दिली. पण गावातील शासकीय जागेत अशा स्वरुपाचा कुठलाही रस्ता सध्या अस्तित्वात दिसत नसल्याने आपण पोलिसांकडे तक्रार केल्याचे द्यानद्यान यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून ग्राम पंचायतीला थेट निधी मिळतो.

या निधीतून हे काम झाले की जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समितीच्या (panchayat samiti) बंधीत व अबंधित या स्वरुपातील कामांच्या यादीतून हे काम घेण्यात आले होते. याविषयी ग्राम पंचायतीकडे माहिती मागितली असता, त्यांनी कुठे काम झाले, याविषयी माहिती दिलेली नाही. पण शासनाच्या दप्तरी पैसे दिल्याची नोंद असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यामुळे पैसे नेमके कुठे खर्च झाले याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे. पोलिसांनी ही चौकशी फिर्यादी समोर आणि इनकॅमेरा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे गावातून चोरीला गेलेला रस्ता शोधून देणार्‍या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, अशी माहितीही तक्राराने दिली आहे.

रस्ता शोधून देणार्‍यास एक लाख बक्षीस गावातील रस्ता शोधून देणार्‍या व्यक्तिस एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. पूर्वानुभव बघता पोलिसांनी फिर्यादीच्या समोर इनकॅमेरा चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे.

- विठोबा द्यानद्यान, जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार महासंघ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com