नवीन नाशिक | Nashik

वावरे नगर परिसरात एका गादीच्या दुकानाला आग लागून संपूर्ण माल जळून खाक झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वावरे नगर परिसरातील जी एम गादी सेंटर या दुकानाला दुपारी २ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. हे दुकान एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये असल्याने आगीमुळे दुकानाच्या वर असलेल्या कार्यालयाच्या काचा देखील तडकल्या.

या घटनेची माहिती समजताच सातपूर अग्निशामन दलाचे प्रदीप परदेशी, विजय मुसळे, ताराचंद सूर्यवंशी, अशोक मोरे, महेश बागुल, बाळू पवार आदींच्या पथकाने घटनास्थळी हजर होऊन अवघ्या काही मिनिटातच आग आटोक्यात आणली.

या आगीत सुमारे अडीच लाखाचे सामान जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.