शहरात दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

शहरात दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात (Nashik City) दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीमध्ये (Burglary) चोरट्यांनी (Thieves) लाखोंचा ऐवज लंपास करीत पोबारा केल्याची घटना घडली...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीतील शालिनी सोपान बोराडे (Shalini Sopan Borade) (45, रा. गणेशकृपा रोहाऊस नंबर 8, जिजामाता कॉलनी तुळजाभवानी मंदिराच्या मागे, शिवाजीनगर) यांच्या घरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला.

हॉलमध्ये टीव्हीच्या खाली असलेले लाकडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले. त्यात 75 हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाची सोन्याची पोत, 70 हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्यांची सोन्याची पोत, पंचवीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोनसाखळी, 70 हजार रुपये किमतीचे 22 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 1150 रुपये किमतीची अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, 25 हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, 5 हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा 2 लाख 71 हजार 150 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नितीन पवार (Nitin Pawar) करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत गजेंद्र सुदर्शन गिरी (Gajendra Sudarshan Giri) (40, रा. फ्लॅट नंबर 8, सदाफुली रेसिडेन्सी, अयोध्या कॉलनी, खुटवडनगर) यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे सेफ्टी कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात तसेच देवाऱ्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले.

त्यात 70 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, एक लाख 80 हजार रुपये रोख, 4200 रुपये किमतीचे चांदीच्या देवी-देवतांच्या मूर्ती असा 2 लाख 54 हजार दोनशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनी कुमार चौधरी (Kumar Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राकेश शेवाळे (Rakesh Shewale), हवालदार चंद्रकांत गवळी (Chandrakant Gawli) करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com