जिल्ह्यात पहाटेच्यावेळी भूकंपाचे सौम्य धक्के

जिल्ह्यात पहाटेच्यावेळी भूकंपाचे सौम्य धक्के

नाशिक । Nashik

जिल्ह्याला शनिवारी (दि.८) पहाटे पाच वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

नाशिकपासून ९६ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. मेरी भूकंप मापन केंद्र येथे या धक्क्यांची नोंद झाली.

मेरी भूकंप मापन केंद्राच्या वैज्ञानिक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यात पहाटे पाच वाजता हे धक्के जाणवले आहे.

गांडोळे, टेटमाळ, चिकाडी, घाटाळ, बारी, सावरपातळी, देहेरे, मोखनळ, योगेश्वरनगर, बोरवण, कुहिआंबी, उपिळपाडा, सावरपाडा व रडतोंडी या गावांमध्ये हे धक्के जाणवले. तर पेठ तालुक्यातील कळमबारी, दाबदरी, विरमाळ, पाहू, चीबारी व सुरगाणा तालुक्यातील टाटूपाडा, मास्तेमानी, ओरंभे, दुमी या गावांमध्ये हे सौम्य धक्के बसले.

या धक्क्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com