ननाशी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

नागरिकांमध्ये घबराट
ननाशी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
USER

ओझे । वार्ताहर

तालुक्यातील ननाशी परिसरात दुपारी चार च्या सुमारास पुन्हा भूकंपाचा 2.4 रिकटर स्केलचा सौम्य धक्का बसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे 14 मे रोजी या परिसरात असेच धक्के जाणवले होते.

मेरी संस्थेत सदर भूकंपाची नोंद झाली असून नाशिक पासून 40 किलोमीटर वर भूकंपाचा केंद्रबिंदू असून दुपारी 4: 12 मिनिटांनी 2.4 रिकटर स्केलचा धक्का बसल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली आहे.

पेठ - दिंडोरी - सुरगाणा- कळवण तालुक्याचे सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .आज ही धक्का जाणवताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला .परिसरात एकमेकांना फोन करत माहिती घेतली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com