भुकंप/Earthquake
भुकंप/Earthquake
नाशिक

पेठ परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का

कुठलीही हानी नाही

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

पेठ | Peth प्रतिनिधी

तालुक्यातील आसरबारी , फणसपाडा, जुनोठी, करंजाळी, पेठ परिसरात आज सकाळी ११ : ०५ वाजे दरम्यान जमीन थरथरल्याची बाब नागरीकांच्या निर्दशनास आली.

मात्र मागील दोन वेळा ओझरच्या एच ए एल कारखान्यात सुखोई विमान उडान दरम्यानचा आवाज असल्याचे निष्पन्न झालेले असल्याने हा कंप त्याच प्रकारात आहे किंवा कसे याचा उलगडा होत नव्हता.

त्यातच मेरी येथील भुकंपमापन केंद्रातील दुरध्वनी वाजत होता. मात्र कुणीही प्रतिसाद देत नव्हते. ही बाब तहसिलदार यांना कळविण्यात आले नंतर सदरचा प्रकार हा सौम्य भुकंपाचा असल्याचा प्रकार स्पष्ट झाला आहे.

सदरचे केंद्रात ६ सेकंद व २: o८ रिष्टर क्षमतेचा असल्याचे स्पष्ट झाले. जनतेत घबराट निर्माण झाली असली तरीही कुठलीही जिवीत अथवा वित्तीय हानी बाबत अहवाल प्राप्त झालेला नाही.

Deshdoot
www.deshdoot.com