मायको सोसायटी निवडणूक: नवीन चेहर्‍यांना संधी; तिघे विद्यमान विजयी

मायको सोसायटी निवडणूक: नवीन चेहर्‍यांना संधी; तिघे विद्यमान विजयी

सातपूर | प्रतिनिधी | Nashik

येथील मायको एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (Mico Employees Co-Op Credit Society) पंचवार्षिक निवडणुकीत (election) संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी मतदान (voting) घेण्यात आली.

विद्यमान तीन संचालकांना पुन्हा संधी मिळाली. उर्वरित नवीन चेहर्‍यांना संधी मिळाली आहे. मतदान प्रक्रिया (Voting process) शांततेत पार पडली. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

मायको कामगार पतसंस्थेच्या (Mico Labor Credit Institution) 14 जागांपैकी एका जागेवर वार्ड क्रमांक एक मधून कुणाल गुंडे यांची बिनविरोध निवड (Uncontested choice) झाली आहे. तर उर्वरीत 13 जागांसाठी कंपनीच्या आवारात मतदान (voting) घेऊन लगेच मतमोजणी करण्यात आली. त्यात वार्ड निहाय आठ जागांवर वार्ड क्रमांक दोन मध्ये मनोज काकड (विद्यमान) 56 मते मिळवून विजयी झालेत.

वार्ड क्र.तीन मधून विद्यमान संचालक कैलास मोरे (38)विजयी झालेत,वार्ड क्र.चार मधून सचिन घुमरे(32)विजयी झालेत. वार्ड क्र.पाच मधून किरण हेगडे(36)विजयी झालेत.वार्ड क्र.सहा मधून विद्यमान संचालक श्याम शिंदे (27) विजयी झालेत.वार्ड क्र.सात मधून सचिन माडीवाले (29) विजयी झालेत.वार्ड क्र.आठ मधून पोपट बोडके(34) विजयी झालेत.वार्ड क्र.नऊ मधून केतन गाडे (27) विजयी झालेत.वार्ड.क्र.दहा मधून शेखर पणेर (47) विजयी झालेत.वार्ड क्र.11 मधून कीशोर गिलबिले (42) विजयी झालेत.

इतर मागासवर्गीय गटातून भाऊसाहेब बच्छाव (396)विजयी झालेत. अनुसूचित जाती/जमाती गटातून मच्छीन्द्र अहिरे(395) विजयी झालेत,भटक्या विमुक्त जाती/जमाती गटातून संतोष वैष्णव (565) विजयी झालेत.एकूण 13 जागांसाठी 40 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी राजेश सानप यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com