
नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik
उंटवाडी ( Untwadi ) परिसरातील अतिप्राचीन ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा ( Mhasoba Maharaj Yatra ) कमेटीच्यावतीने दोन दिवसीय श्री म्हसोबा महाराज यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सकाळी श्रींची महापूजा आणि दुग्धाभिषेक करण्यात आला.
सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या अतीप्राचिन यात्रेनिमित्त अतिप्राचीन ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांचा पंचधातुचा मुखवटा बसविण्यात येणार असून दुपारी श्री म्हसोबा महाराज मुखवटा धान्य शयन व पुण्यावाचन करण्यात आले तर रात्री श्रींच्या समोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आले. (दि. 25) सकाळी 8.00 वा. श्री म्हसोबा महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा व महापुजा करण्यात येणार आहे
तसेच त्यानंतर दुपारी 12ते 4वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच म्हसोबा महाराज पटांगणात रहाड पाळणे तसेच इतर खेळणीच्या वस्तुची दुकाने थाटली आहेत. देवस्थान समीतीच्यावतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी डॉ चारुशिला नाईक गवळी आणि डॉ स्वाती माळी( नाईक) यांचे होमिओपॅथी उपचार सल्ला व मार्गदर्शन लाभणार आहे.
या यात्रौत्सव आणि धार्मिक सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा कमेटी अध्यक्ष मधुकर तिडके, उपाध्यक्ष दिनकर तिडके, सरचिटणीस सदाशिव नाईक,सह सेक्रेटरी रामचंद्र तिडके , खजिनदार अंबादास जगताप , सह खजिनदार विलास जगताप, ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या पदाधिका-यांनी केले आहे.