म्हसोबा महाराज यात्रोत्सवास सुरूवात

म्हसोबा महाराज यात्रोत्सवास सुरूवात

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या नेहरूनगर हॉस्पिटल समोरील पाच बंगला परिसरातील जागृत देवस्थान समजल्या जाणार्‍या श्री म्हसोबा महाराज यात्रेला (Shri Mhasoba Maharaj Yatra )काल प्रारंभ झाला. ही यात्रा दोन दिवस चालणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोना असल्यामुळे यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत नव्हती.

परंतु यावर्षी सर्व निर्बंध मुक्त करण्यात आल्याने यात्रेला आज प्रारंभ झाला. मांडव डहाळे, महाआरती, पूजा, तकतराव मिरवणूक, रथयात्रा आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पूजेला प्रारंभ झाला.

याप्रसंगी माजी महापौर दशरथ पाटील, माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, छत्रपती युवा सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, बाळासाहेब वाजे, गंगाधर उगले, संपत खोले, न्यायाधीश तुषार वाजे, रुंजा पाटोळे, अनिल लवटे, काशिनाथ जाचक, बापू गायकवाड आदी उपस्थित होते. या सर्वांचे मंदिराचे पुजारी दशरथ कदम यांनी फेटे बांधून स्वागत केले.

यात्रेचा आज रविवार दिनांक 24 रोजी शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजता कदम मळा येथे कुस्त्यांची विराट दंगल होणार आहे.

Related Stories

No stories found.