नाशिक । Nashik

जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव मागील वर्षी दुष्काळामुळे चर्चेत आले होते. दरम्यान सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून या गावात नुकतेच पाणी पोहोचले. पहिल्यांदाच नळातून आलेल्या पाण्यात गावकरी नखशिखांत भिजले.

गेल्या दीड वर्षापासून एसएनएफ या संस्थेच्या माध्यमातून म्हैसमाळला पाणीदार करण्यासाठी मेहनत घेत होते. हि मेहनत फळाला आल्यानंतर गुरुवारी म्हैसमाळ पाणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.

मागील वर्षी नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ या गावाचा भीषण दुष्काळ राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. गावातील विहिरीला तासाभरात येणारे दोन- तीन हंडे पाणी भरायला मशाली लावून रात्र-रात्र जागणाऱ्या म्हैसमाळकरांच्या दुर्दैवाचे फेरे सगळ्यांनीच पाहिले होते. अंधारात मशाली पेटवून खोल विहिरीत उतरून एक हंडा पाणी मिळणेही या गावच्या आनंदाची परिसीमा बनली होती.

महिला, मुलांसह सर्व गावकरी उन्हाळ्यात या भयंकर पाणीटंचाईला तोर देत असतानाच माध्यमामध्ये या विदारक परिस्थितीच्या बातम्या आल्या. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या सदस्यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी या गावचा पाणीप्रश्न सोडवण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणे फोरमची एक टीम निधी संकलन आणि दुसरी टीम पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना शोधण्याच्या कामी लागली.

गावक-यांनाही श्रमदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी काम सुरू झाले. विहीर आणि पाईपलाईनचे काम बरेच पूर्णत्वास गेले पण पावसाळ्यामुळे पुढे स्थगित ठेवावे लागले. यावर्षी फेब्रुवारीत पुन्हा काम सुरू झाले, मात्र लगेचच करोना महामारीचे संकट उद्भवल्याने पुन्हा कामात खंड पडला.

पण एप्रिल-मे महिन्यात म्हैसमाळला नेहमीसारखे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य सुरू झाले आणि गावकन्यांच्या नशिबी पुन्हा पाण्यासाठी रानोमाळ होती. या परिस्थितीत फोरमच्या टीमने काहीही करायचेच असे ठरवले.

सुरक्षिततेचे नियम पाळून अहोरात्र काम करत पाईपलाईन, विहिरीचे काम पूर्ण केले. फोरमच्या टीमने तांत्रिक बोगदान दिले. मुंबईच्या करुणा चौरटेबल ट्रस्टने पाईप्स दिले, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट आणि हैदराबादच्या नरसिम्हन बांनी आर्थिक योगदान दिले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिसरातील शेतकरी धूम बाबांनी विहिरीसाठी एक पैसा न घेता आपल्या शेतातील जागा दिली. ग्रामपंचायतीनेही गावात टाकी बांधण्याची जबाबदारी पार पाडली.

या सर्वांच्या प्रयत्नातून गावात पाणी आणण्यात बश मिळाले आणि गावक-यांनी एकच जल्लोष केला. बावेळी पाण्यासाठी घ्यावे लागणारे काबाड कष्ट संपल्याचे आया-बहिणींचे आनंदाश्रू बरेच काही सांगून गेले.

आमच्या संस्थेकडून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागातील दुष्काळ हटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत २२ गावांमधील दुष्काळ दूर केला असून येत्या दोन वर्षांत गावांची संख्या २०० वर जाणार आहे. दरम्यान अनेकांच्या प्रयत्नातून गावात पाणी आणण्यात यश आले. यावेळी पाण्यासाठी घ्यावे लागणारे काबाड कष्ट संपल्याचे आया-बहिणींचे आनंदाश्रू बरेच काही सांगून गेले.

- प्रमोद गायकवाड, संचालक, सोशल नेटवर्किंग फोरम, नाशिक