आयएमएचा पुढाकार : सायकल स्वारी, एक दिवा लावू दारी

आयएमएचा पुढाकार : सायकल स्वारी, एक दिवा लावू दारी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आत्महत्या (Suicide) ही एक जागतिक समस्या असून दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसत आहे. या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) 10 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (World Suicide Prevention Day) साजरा करते.

यंदाच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association), मानसोपचार तज्ञ संघटना (Association of Psychiatrists), जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (District Mental Health Program यांच्यातर्फे सायकल स्वारी, एक दिवा लावू दारी उपक्रम राबविण्यात आले.

पूर्ण जगात दरवर्षी 8 लाख आत्महत्या होतात, म्हणजेच प्रत्येक 40 सेकंदाला जगात कोणीतरी आयुष्य संपावते आहे. या पेक्षा 20 पट जास्त लोक आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) करतात.

म्हणून आत्महत्या ही एक मोठी सामाजिक समस्या असून आत्महत्या प्रतिबंध ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे या विचारास धरून हे उपक्रम आयोजित केल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ हेमंत सोननीस (IMA President Dr. Hemant Sonnis) यांनी सांगितले. डॉ जेजुरकर, डॉ चव्हाण, डॉ किरण राजोळे, डॉ राहुल सोनवणी, डॉ माधवी मुठाळ, डॉ पंकज भदाणे, डॉ स्मिता दहेकर आदींनी सर्व उपक्रम राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

एक दिवा लावू दारी

10 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान रात्री 8 वाजता जागतिक आत्महत्या प्रतिबंधन दिवसाच्या निमित्ताने आपल्या घराच्या खिडकीत प्रत्येकाने एक मेणबत्ती लावावी असे आवाहन नाशिक आयएमए आणि नाशिक मानसोपचार तज्ञ संघटना यांच्यातर्फे करण्यात आले होते.

त्यानुसार शहरातील अनेक नागरिक, डॉक्टर यांनी आपापल्या घरात, ऑफिसमध्ये दिवा किंवा मेणबत्ती लावून या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक आणि आरोग्य विषयक चळवळी मध्ये सहभाग घेतला असे डॉ. सोननीस यांनी सांगितले.

सायकल स्वारीद्वारे प्रबोधन

आत्महत्या प्रतिबंधासाठी सायकल रविवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी सायकल स्वारी द्वारे आत्महत्या प्रतिबंधाचा संदेश समाजास देण्यात आला. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर रॅलीचे आयोजन टाळण्यात आले. कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली. तसेच घोषणा दिल्या गेल्या नाहीत.

सायकलला पत्रके लावून या विषयावर संदेश प्रदर्शित होईल अशा प्रकारे 4 जणांच्या चमूत सुरक्षित अंतर पाळत शहराच्या विविध भागात जनजागृती केली गेली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन (Nashik Cyclists Foundation) तसेच आयर्न मॅन (Iron Man) चा किताब पटकावणाऱ्या आय एम ए चे सदस्य डॉ वैभव पाटील (IMA member Dr. Vaibhav Patil) आणि डॉ अरुण गचाले (Dr. Arun Gachale) यांनी देखील सहभागी होत या अभियानास पाठिंबा दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com