गुणवंत सेवक संस्थेचे भूषण

मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांचे प्रतिपादन
गुणवंत सेवक संस्थेचे भूषण

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

शरद भदाणे ( Sharad Bhadane) हे संस्थेतील उच्चविद्या विभूषित कर्मचारी होते. त्यांनी महाविद्यालयातील आर्थिक हिशेबाची कामे चोखपणे पार पाडली. आज ते सेवानिवृत्त होताना एक पोकळी जाणवते. त्यांच्यासारखा सुसंवादी व संयमी स्वभाव प्रत्येकाने अंगिकारला पाहिजे. गुणवंत कर्मचारी हे संस्थेचे भूषण असतात. त्यांनी संस्थेची केलेली सेवा ही संस्थेचे नावलौकिक वाढवणारी असते, असे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार (MVP general secretary Neelima Pawar)यांनी केले.

मविप्रच्या पिंपळगाव येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील कार्यालय अधीक्षक शरद दौलत भदाणे यांच्या सेवापूर्ती समारोपाचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपसभापती राघोनाना आहिरे, संचालक प्रल्हाद गडाख, डॉ.विश्राम निकम, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वास मोरे, उल्हास मोरे, नंदू कोर, रत्नाकर कदम, शिवाजी रौंदळ, अरविंद जाधव, प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. सरचिटणीस नीलिमा पवार व मान्यवरांच्या हस्ते अधीक्षक शरद भदाणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सेवापूर्तीनिमित्त संस्थेचे उपसभापती राघोनाना आहिरे, संचालक प्रल्हाद गडाख, डॉ. विश्राम निकम, उल्हास मोरे, प्रा.यशवंत शिरसाठ, प्रा.अल्ताफ देशमुख, डॉ.सुधीर जोशी, आनंदा पवार, कु. सुरभी भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी मविप्र संस्थेतील 32 वर्षे प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी संस्थेचे सभासद, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार, विविध महाविद्यालयांतील सहकारी, कर्मचारी व शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य ज्ञानोबा ढगे यांनी केले तर प्रा.डॉ.साहेबराव मोरे यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com