जिल्ह्यात पारा @१०.०१ अंश सेल्सिअसवर

चालु हंगाम सर्वात कमी किमान तापमान
जिल्ह्यात पारा @१०.०१ अंश सेल्सिअसवर

नाशिक । Nashik

उत्तर भारतात जम्मू काश्मिरपासुन उत्तराखंडपर्यत बर्फवृष्टी सुरू झाली असुन यामुळे याभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदाच्या हगामात पहिल्या काही दिवसातच विक्रमी बर्फवृष्टी सुरू आहे.

यामुळे उत्तरेकडुन शितल वारे वाहु लागल्याने याचे परिणाम दिल्लीपासुन मध्य भारतापर्यत जाणवू लागले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाल्यानंतर पुन्हा आज (दि.6) पारा 10 अंशापर्यत खाली आला आहे. दरम्यान यंदाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यात आज 10.1 अंश सेल्सीअस अशी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. अचानक पारा घसरल्याने पहाटेच्या गारठ्याने अनेकांना हुडहुडी भरली आहे.

देशातील उत्तरेतील राज्यात बहुतांशी भागात बर्फवृष्टी सुरू झाली असुन बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याभागात उणे तापमानाचा फटका दिल्लीसह शेजारीला राज्यांना बसत आहे. उत्तरेेकडुन येणार्‍या शितल वार्‍याचे परिणाम महाराष्ट्रात पुन्हा दिसु लागले आहे. या हवामान बदलामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्र या भागात किमान तापमानात पुन्हा किंचीत घट झाल्याने राज्यात पुन्हा थंडीचे आगमन झाले आहे.

मागील वर्षात डिसेंबर महिन्यात असलेली थंडीची स्थिती पाहत यंदा लवकरच थंंडीची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 12 नोव्हेंबर रोजी राज्यात पारा 12 वरुन 9.5 अंशापर्यत खाली आला होता. यावेळी नाशिक जिल्ह्यात 10.4 अंश असे किमान तापमान नोंदविले गेले होते.

यानंतर आज राज्यातील पुन्हा एकदा किमान तापमान घसरल्याने नाशिक जिल्ह्यात 10.1 अशा सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर आज नाशिक जिल्ह्यातील निफाड 10 अंशांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 1 व 2 डिसेंबर रोजी किमान तापमान 16 ते 18 अंशाच्या दरम्यान होते, आज अचानक पारा दोन अंशांनी खाली आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचे आगमन झाल्याचे दिसुन आले.

या घसरलेल्या तापमानामुळे द्राक्ष बागाईतदारांची चिंता वाढली आहे. गेल्या तीन दिवसात दोन ते अडीच अंशांने पारा घसरल्याने आज ग्रामीण भागात रात्री व पहाटेच्या दरम्यान शेकोटी पेटू लागल्या आहे. तर पहाटे शेतात काम करणारे व कामावर जाणार्‍यांना मोठी हुडहुडी भरु लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com