२१ शेतकऱ्यांचे ७२ लाख घेऊन व्यापारी फरार

२१ शेतकऱ्यांचे ७२ लाख घेऊन व्यापारी फरार
Tomato garden uprootedshivade

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील गिरणारे (Girnare) मोठ्या बाजारपेठेतील एक बाजारपेठ म्हणून परिचित आहे. याठिकाणी पंचक्रोशीतून शेतमाल विक्रीसाठी दाखल होतो. मात्र येथील एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना जादा भाव देण्याचे आमिष दाखवून जवळपास ७० लाखांना गंडा घातल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.

रविवारी (दि. ०७) रोजी एका व्यापाऱ्याने जवळपास ७० लाख रुपयांचे टमाटे खरेदी (Tomato Sale) करून पैसे न देताच पोबारा केल्याची घटना घडली. रविवारपासून या व्यापाऱ्याचा फोन बंद असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Merchant run away from girnare market)

एक-दोन नाही तर तब्बल २१ शेतकऱ्यांचे पैसे घेऊन व्यापारी फरार झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. फसवणुकीचे प्रकार वाढतच असल्याने शेतकऱ्यांना वाली नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

गिरणारे बाजारात हरसूल, वाघेरा, गणेशगाव, दुड्गाव, हिरडी, रोहिले, महिरावणी, पिंपळगाव, दुगाव आदी भागातून शेतकरी शेतमाल घेऊन येत असतात.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर टोमाटो पिकाची लागवड केली जात असल्याने हजारो व्यापारी गिरणारे येथे गोडावून उभारून येथे शेतमालाची खरेदी विक्री केली जाते.

बाजार समितीत शेतमालाला मिळणाऱ्या दरापेक्षा गिरणारे येथे शेतमालाला थोडा अधिकचा भाव व्यापाऱ्यांकडून दिला जात असल्याने शेतकऱ्यांची याठिकाणी पसंती असली तरी, त्यातून फसवणुकीचे प्रकारही घडू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

एकीकडे कोरोनाच्या काळात कंबरडे मोडले असतांना, कसेतरी उभे राहिलो होतो. त्यातच व्यापाऱ्याने फसवणूक केल्याने आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.

रवी साळवे, उपसरपंच दुड्गाव

बाजार समितीचा कोणताही परवाना न घेता, व्यापाऱ्यांकडून परस्पर शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जात आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. गिरणारे येथे व्यापाऱ्याने गंडा घातल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या व्यापाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनीलाभाला बळी न पडता आपला माल बाजार समितीत विक्रीसाठी आणावा व फसवणूक टाळावी.

देविदास पिंगळे, सभापती बाजार समिती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com