गतिमंद मुलांचा उद्या स्नेहमेळावा

गतिमंद मुलांचा उद्या स्नेहमेळावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सर्वसामान्यांइतकेच आपल्यातही कलागुण असल्याचा आनंद मिळवून देण्यासाठी शहर परिसरातील विविध दहा शिक्षण संस्थांच्या गतिमंद-मतिमंंद अशा 500 पाल्यांसोबत एक दिवस त्यांच्या आनंदासाठी व्यतीत करण्यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गुंज फाऊंडेशनच्या ( Gunj Foundation ) माध्यमातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि.29) इच्छामणी लॉन्स येथे सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 दरम्यान हा स्नेहमेळावा होणार आहे. यात प्रामुख्याने विविध खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. या स्नेहमेळाव्यासाठी मतिमंद व गतिमंद मुलांसाठीच्या शहर परिसरातील 10 संस्थांमध्ये असलेल्या 500 पाल्यांचा हा आगळावेगळा स्नेहमेळावा होणार आहे.

या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे विविध खेळ, नृत्य व मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी करून आनंद देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

गुंज फाऊंडेशनच्या महिला विभागाने या उपक्रमाचे नेतृत्व केले आहे. या उपक्रमाचे आयोजन तसेच यशस्वीतेसाठी महिला विंगच्या विनिता बंका, सुनीता गनेरीवाल, शुभदा बोरा, अनुपमा नारंग, कोमल कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली महिला सदस्य कार्यरत आहेत.

ओळख गुंजची

गुंज फाऊंडेशन (Gunj Foundation )ही संस्था विविध क्षेत्रातील 50 दाम्पत्यांचे संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून दर महिन्याला विविध बालकाश्रम व वृद्धाश्रमांमध्ये जाऊन त्यांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांच्या सोबत सायंकाळच्या स्नेहभोजनासह वेळ व्यतीत करण्याची परंपरा ठेवण्यात आलेली आहे. याच मालिकेत हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.