खाकीतील माणुसकी; मनोरुग्ण महिलेस जीवदान

खाकीतील माणुसकी; मनोरुग्ण महिलेस जीवदान

नवीन नाशिक । वार्ताहर Nashik

गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाथर्डी फाटा ( Pathardi Phata ) येथील प्रशांतनगर परिसरात एक मनोरूग्ण महिले अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्यामुळे परिसरातील लहान मुले व महिला घराबाहेर पडण्यास घाबरत होती. मात्र आज सकाळी सदर महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने एका जागरूक नागरिकाने पोलिसांना ( Police ) सदर माहिती देताच पोलीसांनी मनोरूग्ण महिलेस रूग्णालयात दाखल करून उपचार करत खाकीतील माणुसकीचे दर्शन घडवले.

कुठल्याही प्रसंगी हाकेला प्रतिसाद देऊन जनतेच्या अडी-अडचणीत धावून येणारे इंदिरानगर पोलिस ठाण्याचे ( Indira Nagar Police Station ) कर्तव्यदक्ष वपोनि निलेश माईनकर यांना सकाळी 9 वाजेच्या दरम्यान डॉ. खैरनार यांनी फोन केला.

त्यानुसार एक मनोरूग्ण महिला अर्धनग्न व गलिच्छ अवस्थेत गेल्या आठ-दहा दिवसांपासून जोरदार आरोळ्या मारत फिरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक घराबाहेर निघण्यास धजावत नाहीत.

सदर महिलेच्या तिच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर माईनकर यांनी विजया खैरनार, आव्हाड, विकास पाटील या सहकार्‍यांना तातडीने आदेश देऊन सत्यस्थिती जाणून घेण्याचे सांगितले.

या पथकाने सदर ठिकाणी दाखल होऊन मनोरूग्ण महिलेस ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून मानवसेवा केअर सेंटरमध्ये दाखल केले. प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मानवसेवात केअर सेंटर वृध्दाश्रम या संस्थेचे संस्थापक टी.एल नवसागर यांनी या मनोरूग्ण महिलेस आश्रय दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com