आजपासून मेमू एक्स्प्रेस धावणार

आजपासून मेमू एक्स्प्रेस धावणार

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

प्रवाशांतर्फे सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत अखेर भुसावळ-इगतपुरी मेमू एक्सप्रेस Bhusawal-Igatpuri Memu Express सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने Central Railway Administrationघेतला. आज दि. 10 जानेवारीपासून मेमू एक्स्प्रेस धावणार असून या गाडीला थांबा दिल्याने नांदगावकर सुखावले आहेत. शहर व तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय मेमू रेल्वेमुळे दूर होणार आहे.

गत दोन वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावाने रेल्वे प्रशासनाने रेल्वे थांबे रद्द केले होते. प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे प्रशासनाने सेवाग्राम, महाराष्ट्र एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करण्यात आले होते. आता भुसावळ-इगतपुरी मेमू एक्सप्रेस सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने पॅसेंजर ट्रेनची सेवा आता एक्सप्रेस मेमू ट्रेनच्या रूपात देणे सुरू केले आहे. एसटी सेवकांच्या संपाने त्रासलेल्या ग्रामीण प्रवाशांना मेमू रेल्वेने तूर्त तरी दिलासा मिळणार आहे.३

मध्य रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेन्सच्या रेस्टोरेशन सुविधेअंतर्गत भुसावळ-इगतपुरी मेमू एक्सप्रेस ही गाडी सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार अखेर मंजुरी दिली आहे. त्यानुसार पहिली 10 डब्यांची भुसावळ- इगतपुरी मेमू एक्सप्रेस उद्या 10 जानेवारीला भुसावळहून सुटणार आहे. भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी सकाळी 7 वाजता भुसावळहून सुटणार आहे. सदर गाडीचे भाडे एक्स्प्रेसप्रमाणेच आकारले जाणार आहे.

दरम्यान, तालुक्यातील अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. नांदगावकरांच्या हक्काच्या रेल्वे गाड्या संदर्भात केद्र सरकारमधील लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. रेल्वे स्थानकावर काशी, कामायनी, महानगरी, झेलम या रेल्वे गाड्यांचे थांबे पुर्ववत करण्यासाठी कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मात्र जळगावच्या नेत्यांनी आपल्या भागातील आवश्यक रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून दिला आहे. त्यामुळे नाशिकचे राजकीय वजन कमी पडतेय की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.